🕒 1 min read
मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणारी एक घटना आता घडली आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटो देशांच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथील नागरी सरकार कोसळले आहे. आणि पुन्हा एकदा तालिबानचे रानटी राजवट जोर धरत आहे. यानंतर, महिलांना लैंगिक गुलाम बनवल्याच्या आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या बातम्यांमुळे जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमधील या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधून देखील चिंता व्यक्त केली आहे.
![]()
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मेसेज लिहून अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रियाने लिहिले, ‘जेव्हा जगभरातील महिला समान वेतनासाठी लढत आहेत, तेव्हा त्यांना अफगाणिस्तानमध्ये विकले जात आहे. तिथे महिला स्वतःच मजुरी बनल्या आहेत. अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्यांकांची स्थिती पाहून मन दुखावले. मी जागतिक नेत्यांना आवाहन करते की त्याविरुद्ध उभे राहा. पितृसत्ता नष्ट झाली पाहिजे. स्त्रिया सुद्धा मानव आहेत.
अभिनेत्री सोनी राजदान यांनी ट्विट करून लिहिले, ‘जेव्हा एक देश आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो, तेव्हा दुसरा देश आपले स्वातंत्र्य गमावत असतो….जग काय आहे.’
While one country celebrates their Independence another loses theirs … what a world this is
— Soni Razdan (@Soni_Razdan) August 15, 2021
दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, ‘अफगाणिस्तानच्या लोकांसाठी विशेष प्रार्थना. परकीय शक्तींच्या वसाहतवादी महत्त्वाकांक्षांमुळे नष्ट झालेले राष्ट्र.’
Special prayer ???? for the people of Afghanistan. A nation wrecked and destroyed by colonial ambitions of foreign powers. #Afganistan
— Shekhar Kapur (@shekharkapur) August 16, 2021
अभिनेत्री टिस्का चोप्रा हिने काबूलमधील तिच्या बालपणीचे दिवस आठवत ट्विट केले आहे. काबूलमधील तिचे बालपणीचे फोटो शेअर करत टिस्का यांनी लिहिले, ‘काबुल खूप सुंदर होते, तिथेच वाढले. आता जे घडत आहे ते हृदय विदारक आहे. देशाच्या शांतीसाठी प्रार्थना.
https://twitter.com/tiscatime/status/1427117915510251526?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- लाज वाटली पाहिजे! समाजवादीच्या खासदाराला राष्ट्रगीतच येईना, पहा ‘हा’ व्हिडिओ
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
