Share

‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. मोदींनी यावेळी भाषण करताना केंद्र सरकारने केलेल्या कामांची यादी तसेच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. तसेच देशाच्या उज्ज्वल भवितव्यावरही त्यांनी भाष्य केले. देशवासियांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत नरेंद्र मोदींनी भाषण संपवलं. जवळपास दीड तास मोंदींनी भाषण केलं.

ते म्हणाले, कोरोनानंतर देशात नव्या वर्ल्ड ऑर्डरची शक्यता आहे. आज संपूर्ण जग भारताला नव्या दृष्टीने पाहत आहे. एक म्हणजे दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत या दोन्ही आव्हानांशी लढत आहे. पूर्ण हिमतीने उत्तरही दिलं जात आहे. नवी शिक्षण योजना गरिबीसोबत लढण्यासाठी असून मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देईल असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

‘मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात. आजपासून २५ वर्षांनी २०४७ मध्ये जेव्हा १०० वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. २५ वर्षानंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल’ असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!