औरंगाबाद : वाहनांची संख्या वाढल्याने प्रदुषण देखील झपाट्याने वाढत आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने येत्या काळात मनपा तर्फे ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मनोदय प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज रविवारी व्यक्त केला.
सध्या सर्वत्र वाहनाचा वापर व संख्या वाढली आहे. दिवसागणिक यात मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे प्रदूषणाने होणाऱ्या आजाराचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहेत. मनपाकडे देखील कचरा संकलना करिता घंटागाडी, अधिकाऱ्यांना चारचाकी, विविध विभागाकरीता वेगवेगळी वाहने आहेत.
प्रदूषण कमी करण्या करिता विविध कंपनीच्या वतीने आता ई व्हेकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुलनेने ही वाहने पेट्रोल वाहणापेक्षा कमी खर्चिक पडतात. याच अनुषंाने येत्या काळात मनपा ई -व्हेईकलस खरेदी कारणार आहे. यामुळें काही प्रमाणात मनपाचाही हातभार प्रदुषण कमी करण्यास लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुलच्या शतकी खेळीने वाढल्या ‘या’ खेळाडूंच्या अडचणी, पुनरागमनाची वाट झाली खडतर
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

