नवी दिल्ली : आपल्याला असा आधुनिक भारत बनवायचा आहे जिथे सर्व नागरिकांना अत्याधुनिक सुविधा असतील. आपल्याला पुढील २५ वर्षांत समृद्धीचे नवीन शिखर गाठायचे आहे. अशा विकासाचे निर्माण करायचे आहे, जिथे शहर आणि ग्रामीण असा भेद राहणार नाही असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून ते देशाला संबोधित करत आहेत.
‘जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे. सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटीमुळे लडाख उच्च शिक्षणाचे केंद्र बनणार आहे’ असे मोदी म्हणाले.
सभी के सामर्थ्य को उचित अवसर देना, यही लोकतंत्र की असली भावना है।
जम्मू हो या कश्मीर, विकास का संतुलन अब ज़मीन पर दिख रहा है।
जम्मू कश्मीर में डी-लिमिटेशन कमीशन का गठन हो चुका है और भविष्य में विधानसभा चुनावों के लिए भी तैयारी चल रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2021
लवकरच ईशान्येतील सर्व राज्यांच्या राजधानी रेल्वे मार्गाद्वारे जोडल्या जाती. ईशान्य भारताच्या विकासाठी पर्यटन, अॅडव्हेंचर स्पोर्ट्सला चालना दिली जाईल. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. देशाच्या विकासासाठी ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आपल्या नवीन संकल्प सोडावे लागतील. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहू नये, यासाठी संकल्प करूया असे आवाहन मोदींनी केले.
हमारा पूर्वी भारत, नॉर्थ ईस्ट, जम्मू-कश्मीर, लद्दाख सहित पूरा हिमालय का क्षेत्र हो, हमारी कोस्टल बेल्ट या फिर आदिवासी अंचल हो, ये भविष्य में भारत के विकास का बड़ा आधार बनेंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2021
म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार
देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. लोकांचा संघर्ष आणि त्याग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ ऑगस्ट हा आता फाळणी भयस्मृती दिवस म्हणून पाळला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल. ज्यांनी अत्याचार सहन केले, सन्मानासोबत अंत्यसंस्कारही मिळाले नाही ते आपल्या आठवणीत जिवंत राहणं गरजेचं आहे असेही मोदी म्हणाले.
कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय
कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय झाल्याचे ते म्हणाले. ‘जर भारताकडे आपली लस नसती तर काय झालं असतं. पोलिओची लस मिळवण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागली होती. संपूर्ण जगभरात इतकं मोठं संकट असताना आपल्याला लस कशी मिळाली असती. पण आज सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे. ५४ कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
- ‘अमृत महोत्सवाचे वर्ष नवी ऊर्जा, नवीन चेतना घेऊन येईल’, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
- ‘संजय राठोड प्रकरणात खर-खोटे समजण्यासाठी व्हाइट पेपर काढा’ ; मुनगंटीवारांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

