लखनऊ: काल १५ ऑगस्टरोजी संपूर्ण भारतात ७५ वा स्वातंत्र्यदीन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. कधीच विसरली न जाणारी गोष्ट म्हणजे देशाचे राष्ट्र्गीत. अगदी लहानपणापासून आपण राष्ट्रगीत म्हणत मोठे झालो आहोत. मात्र स्वातंत्र्यदीनाच्या पर्वालाच चक्क खासदारच राष्ट्रगीत विसरले. मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार डॉ.एस.टी. हसन यांना राष्ट्रगीतच आठवेना. ऐन ध्वजारोहनावेळी ही घटना घडली.
Samajwadi party MP from Moradabad,shame on you.
How dare you do this? pic.twitter.com/nsBMsCP8bc— Pranshu Dutt Dwivedi (@PranshuDutt) August 15, 2021
राष्ट्रगीत म्हणताना दुसरे कडवेच डॉ.एस.टी. हसन विसरले. यावेळी त्यांनी चक्क मोबाईल काढत बघण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते इकडे तिकडे बघत गोंधळात पडले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांना समाज माध्यमावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
यावेळी फक्त डॉ.एस.टी. हसनच नाही तर बाकी उपस्थितांनीही शेवटची ओळ म्हणण्यास सुरुवात केली. त्यामुळे लाज वाटली पाहिजे स्वतःचे राष्ट्रगीतही म्हणता येईना अशा प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून ‘या’ चार केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा


