Share

Goa Election 2022 : गोव्यात महिलेची राहुल गांधीना मिठी

Published On: 

🕒 1 min read

गोवा: पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. सर्व पक्ष त्यांच्या परीने निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या गोव्यात प्रचार करत आहेत. या प्रचारावेळी एक विचित्र घटना घडली आहे. राहुल गांधी प्रचार करत असताना एका महिलेने त्यांना चक्क मिठी मारली आहे. आम्ही हातालाच मत देणार अशी ग्वाही त्या महिलीने दिली आहे.

यावेळी दुसऱ्या महिलेने राहुल गांधींसमोर व्यथा मंडळी आहे. गोव्यात भाजपने (Bjp) आतापर्यंत काहीच विकास केला नाही, अशी तक्रारही या महिला राहुल गांधींकडे केला आहे. मिठी मारणाऱ्या महिलेने राहुल गांधींबरोबर एक सेल्फीसुद्धा काढली. काही दिवसातचं या निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. गोव्यात सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे. प्रचाराला राहूल गांधी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते.

गोव्यामध्ये कॉंग्रेस आणि भाजप असा थेट लढा आहे. तरी सुद्धा आप आणि तृणमूल कॉंगेसने गोव्यात त्यांचा पूर्ण जोर लावला आहे. त्यांना किती यश मिळतं हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. गोव्या दौऱ्यावरती असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. पण पाच राज्यात निवडणुका असताना ते अजून पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणिपूर राज्यात प्रचार करताना दिसले नाहीत. तर उत्तरप्रदेशचा संपूर्ण भार त्यांनी त्यांची बहिण प्रियांका वाड्रांकडे सोपवलेला दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!