भीमाकोरेगाव: भीमाकोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यास गेलेल्या अनुयायांवर दि. ०१ जानेवारी २०१८ रोजी हल्ला झाला होता. यावेळी भीमाकोरेगाव परिसरात दंगल माजली होती. तसेच त्या पूर्वी एक दिवस शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी ‘एल्गार परिषद’ घेण्यात आली होती. त्यावेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त प्रशासकीय अधिकारी रश्मी शुक्ला होत्या.
त्यांच्या कार्यकाळात एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या अनेकांवर कारवाई करत अटक करण्यात आली होती आणि अनेकांना कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच भीमाकोरेगाव हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण पुण्यात उठले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची साक्ष महत्वाची ठरणार असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जे एन पाटील आयोगाने केली होती. त्याप्रकरणी त्यांनी एक अहवाल आयोगाला सादर केला आहे.
भीमाकोरेगाव येथे हिंसाचार झाला, तेव्हा विश्वास नांगरे-पाटील हे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे त्यांची साक्ष देखील घेतली जाणार आहे. अशी माहिती आयोगाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंची प्रकृती बिघडली; रुग्णालयात ठेवण्याची वकिलाची मागणी
- “वाईन पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं…” सुजय विखे पाटलांचा टोला
- पाकिस्तानच्या अजून एका जलतगती गोलंदाजावर बंदी
- चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पुत्रशोक झालेल्या आमदार विजय रहांगडालेंचे सांत्वन
- ऐतिहासिक औरंगाबादला ८ दिवसाला पाणीपुरवठा; सरकारमधील मंत्री काय करतात? राज्यपाल कोश्यारी यांची खंत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

