🕒 1 min read
पुणे: माहिती तंत्रद्यान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या पुण्यात मोठ्या प्रमाणात आल्यावर पुणे शहरात लोकांची आणि त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली. पुणेकरांना रोजच वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागात पण रोजच वाहतूक कोंडी होत असते. हडपसर, खराडी या पुण्याच्या उपनगरात पण वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे.
आज असाच काहीसा प्रकार पुण्यातील उपनगरात असणाऱ्या हडपसर भागात झाला आणि पुणेकरांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. या झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हडपसर भागात तब्बल ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तज्ञांनी आज दुपारी हडपसर उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने अचानक दोन्ही बाजूचा उड्डाणपूल सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता .
याबाबत पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाला कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पुणे-सोलापूर रोड आणि सोलापूर-पुणे रोड या दोन्ही दिशेच्या मार्गाला वाहनांच्या तब्बल पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. अचानक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालक दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.
ही कोंडी फोडण्यासाठी हडपसर वाहतूक पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसून आले. हडपसर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी या गोंधळाबाबत माहिती दिली आहे. झेंडे यांनी सांगितलं की, हडपसर उड्डाणपूल जड वाहनासाठी आम्ही बंद केला होता, मात्र अचानक महापालिकेच्या पथकाने उड्डाणपूलाची पाहणी करून पूर्ण उड्डाणपूल सर्वच वाहनांसाठी बंद केला आहे. त्यामुळे चहूबाजूला कोंडी झाली आहे, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, महापालिकेने अचानक उड्डाणपूल बंद केल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप झाला असून ही कोंडी लवकरात लवकर फोडावी, अशी मागणी या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला राग अनावर
- डिमॅट खातेधाराकांनो वेळेत पूर्ण करा ‘हे’ काम अन्यथा…
- विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला एक दिवसाची पोलीस कोठडी
- यवतमाळमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घून हत्या
- “पंकजा आणि सुप्रियाताई या दोन्ही नेत्या निर्व्यसनी”, बंडातात्यांनी मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
