Share

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला राग अनावर 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मोहंमद अझरुद्दीन नंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाची धुरा यशस्वी रित्या खांद्यावर घेणाऱ्या सौरव गांगुलीला राग अनावर झाला आहे. मी भारतीय संघासाठी ४२४ सामने खेळलो आहे तरी मला पण क्रिकेट समजत असा राग आज सौरव गांगुली यांनी व्यक्त केला. सौरव गांगुलीचा  विराट कोहलीबरोबरचा  वाद, बीसीसीआय सचिव जय शाहवर अविश्वास, असे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर केले गेले.

या सर्व आरोपांना उत्तर देताना गांगुली चांगलाच भडकलेला पाहायला मिळतोय. यावेळी आपण भारतासाठी ४२४ सामने खेळल्याचा उल्लेख करत आपला राग व्यक्त केला आहे. काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआय च्या निवड समितीच्या बैठकीमध्ये सौरव गांगुली उपस्थित होता. भारतीय क्रिकेट निवड समितीच्या बैठकीस भारतीय नियामक मंडळाचे सचिव सोडून कोणासही उपस्थित राहण्यास परवानगी नसते तरीही गांगुली कसा काय उपस्थित होता असा प्रश्न विचारात नेटकऱ्यांनी दिग्गज सौरव गांगुलीला चांगलेच ट्रोल केले होते, यावर सौरव गांगुली चांगलाच भडकला.

मी सुद्धा भारतीय संघासाठी ४२४ सामने खेळलो आहे असा राग आज सौरव गांगुली याने व्यक्त केला. गांगुली यावेळी म्हणाले  की, ” भारतासाठी मीदेखील ४२४ सामने खेळलो आहे. पण काही लोकांना या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे मला या सर्व प्रक्रिया माहिती आहेत. माझा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो निवड समितीची बैठक सुरु असतानाचा नाही.

ही बैठक संपल्यावर हा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोमध्ये संयुक्त सचिव जयेश जॉर्जही दिसत आहे. तो निवड समितीचा भाग नाही, पण तोदेखील या फोटोमध्ये आहे. त्यामुळे हा फोटो कोणत्याही औपचारीक बैठकीमधला नाही”. त्याने या वेळीज विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधार पद सोडल्याबद्दल पण आपले विचार मांडले.

          महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!