🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर यांचा (Manushi Chillar) आगामी ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) चित्रपटाचे नुकतच पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यानंतर चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट बघत होते. मात्र करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. काय प्रकरण आहे जाणून घेऊ या.
दरम्यान ‘पृथ्वीराज’अक्षय कुमारच्या लूकवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा ही झाली. मात्र करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एक याचिका दाखल केली होती, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे का? करणी सेनेच्या उपाध्यक्षा संगीता सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एआर मसूदी आणि न्यायमूर्ती एनके जोहरी यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या चित्रपटात पृथ्वीराज यांची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, चित्रपटाच्या प्रिव्ह्यूवरुन हा चित्रपट वादग्रस्त असल्याचे मत करणी सेनेने म्हटले आहे. करणी सेना अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटाचा विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी देखील करणी सेनेकडून अनेक चित्रपटांना विरोध झाला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’ या चित्रपटाचाही करणी सेनेने जोरदार विरोध केला होता. ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २१ जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो होऊ शकला नाही, तो कधी रिलीज होणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- उद्या पुण्यात संजय राऊतांचे उद्योग बाहेर आणणार – किरीट सोमय्या
- पुणे येथील स्लॅब दुर्घटनेची होणार चौकशी; मृतांच्या कुटुंबांना मदत जाहीर
- Kiran Mane : किरण मानेंनी ठोकला ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!
- पाकिस्तानच्या अजून एका जलतगती गोलंदाजावर बंदी
- INDVSWI: भारत बनणार १००० एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
