🕒 1 min read
मुंबई: वाढलेल्या मोबाईल धारकांमुळे भारतात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात गेल्या दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात डिमॅट खाती उघडली जात आहेत. हे गुंतवणूकदार शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करून नफा कमवत आहेत. हे पाहता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने डिमॅट अकाउंटला केवायसी (KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही तुमचं खातं केवायसी करून घेतले पाहिजे. जर तुम्ही तुमचं डिमॅट खात केवायसी केलं नाही, तर ते बंद होण्याची पूर्ण शक्यता आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याबद्दल अधिसूचना काढली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, केवायसी अपडेट करताना तुम्हाला तुमचं नाव, पॅन नंबर, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल एड्रेस आणि उत्पन्न या सर्व बाबींची माहिती द्यावी लागेल. शिवाय तुम्हाला तुमच्या डिमॅट खात्याला वारसदारची नेमणूक करावी लागेल. यासाठी गुंतवणुकदार त्यांच्या एजंटशी किंवा स्टॉक ब्रोकर संपर्क साधू शकतात. ३१ मार्च २०२२ ही केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केवायसी अपडेट न करणाऱ्या खात्यांना बंद करण्यात येईल.
जोपर्यंत ती माहिती पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत ही खाती बंद ठेवली जातील. जर तुमचं खातं बंद झालं असेल, तर संपूर्ण माहिती दिल्यानंतर २४ तासांनी तुमचं खातं पुन्हा सुद्धा करण्यात येईल. जर तम्ही शेयर बाजारात गुंतणूक करत असाल तर लवकरात लवकर आपलं खात केवायसी अपडेटकरून घ्या.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
