Share

एकावेळी दहा मुलांना जन्म दिल्याचा महिलेचा दावा ; अधिकृत चौकशीत धक्कादायक बाब समोर

Published On: 

🕒 1 min read

दक्षिण आफ्रिका : दक्षिण अफ्रीकेमधील गोसियामी या महिलेने एकावेळी दहा मुलांना जन्म दिल्याची घटना काहीदिवसांपूर्वी समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार या आईने 7 मुले आणि 3 मुलींना एकत्र जन्म दिला होता. त्यांच्या प्रेग्‍नेंसीदरम्यान डॉक्‍टरांनी त्यां 6 मुलांना जन्म देतील असे सांगितले होते. पण त्यांचे ऑपरेशन केले त्यानंतर त्यांनी 10 मुलांना जन्म दिला. गोसियामी सांगितले की, त्यांच्या नवऱ्यांला असे वाटत होते की त्यांना 8 मुले होतील. आपल्या सर्व मुलांना स्वस्थ असल्याचे पाहून कुटुंबातील सगळे सदस्य आनंदी आहेत.” असे तिने म्हंटले होते.

मात्र, आता या महिलेच्या प्रेग्‍नेंसीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोसियामी सिथोल (३७) यांनी या महिन्यात दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा अधिकृत चौकशीत खोटा स्पष्ट झाला आहे. गौतेंग प्रांतातील कोणत्याही रुग्णालयात दहा बाळांचा जन्म झाल्याची नोंद नाही, असे प्रांतीय सरकारने निवेदनात म्हटले आहे.

वैद्यकीय चाचण्यांत तर सिथोल या अशात गरोदरदेखील नव्हत्या हे समोर आले. सध्या सिथोल यांना मानसिक आरोग्य कायद्याखाली निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. दहा बाळांना जन्म दिल्याची कथा सांगितली जाण्यामागची कारणे मात्र निवेदनात देण्यात आलेली नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!