पुणे: जर आम्ही इथेनॉल वापराचं आणि उत्पन्नाचं धोरण स्वीकारल नसत, तर महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद झाले असते, असा दावा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार ५ फेब्रुवारी) पुण्यात केला आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ९४ व्या वर्धापन दिनी बोलत होते.
ते म्हणाले,’जर आम्ही इथेनॉल वापरायचं आणि उत्पन्नाचं धोरण स्वीकारलं नसत तर महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद झाले असते. आता आपण साखरेच्या गरजे पेक्षा जास्त उत्पन्न घेत आहोत. फक्त साखरेच्या भारवश्यावर बसून जमणार नाही. म्हणून आपण इथेनॉल उत्पन्न सुरु केल आहे. त्यामुळे फक्त साखर कारखाने वाचले नाहीत तर कच्च्यातेलाच्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड भार येतो, तोही कमी झाला आहे.’
भारतात सध्या ९०० करोड लिटर इथेनॉल बनवला जातो, भारतातील गाड्या बनवणाऱ्यां फ्लेक्स इंजिन (पेट्रोल सह इथेनॉलवर चालणारे) बनवण्यासाठी मी प्रोत्साहन देत आहे, आणि पुण्यात ३ इथेनॉल पंपांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन केले असल्याची आठवण ही त्यांनी करून दिली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

