मुंबई : एका महिन्यातच आणखी एक नवीन पाहुणा भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी आला आहे. धोनीचा हा नवा पाहुणा घोडा आहे. धोनीची पत्नी साक्षीने मुलगी जीवाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. साक्षीने इंस्टाग्रामवर जीवाबरोबर एका लहान घोड्याचा फोटो शेअर केला आहे. मे महिन्यात देखील धोनीच्या घरी एक नवीन पाहुणा आला होता. हा घोडा होता, त्याचे नाव चेतक आहे.
https://www.instagram.com/p/CPp0Do3HMfL/?utm_source=ig_web_copy_link
साक्षी धोनीने चेतकचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वेलकम होम चेतक, असे लिहिले आहे. आयपीएल स्थागिती नंतर धोनी रांची येथील फार्म हाऊसमध्ये कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CPsQ5tgnF_D/?utm_source=ig_web_copy_link
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा सत्र पुढे ढकलल्यानंतर धोनी रांचीमध्ये कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे, त्याचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेत येत आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापर्यंत पॉइंट टेबलमध्ये दुसर्या क्रमांकावर होता. अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएल -14 चा पहिला टप्पा 4 मे रोजी निलंबित करण्यात आला होता. आता हे युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

