Share

“…या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

मुंबई:  मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून एक हजार कोटींचा घोटाळा समोर आला असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“वसुलीबाज शिलेदारांच्या काळ्या पैशाचा छडा केंद्रीय यंत्रणांना लागला आहे. त्याच्या झळा आपल्यापर्यंत येणार या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय. जनतेची लूट पचणार नाही. सर्वांचा हिशोब होणार.”, असा अप्रत्यक्ष टोला अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान यशवंत जाधव यांच्या या घोटाळ्याचा  ईडी, मंत्रालय, आयकर विभागाकडून तपास सुरू असून काही दिवसात कारवाईची अपेक्षा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. यशवंत जाधव यांच्याकडे एवढी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात ते आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!