बारामती : रविवारी (२० मार्च) सायंकाळी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे विमानतळप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे. तसेच या संदर्भात दिल्लीत संरक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक व्हावी, अशी मागणी आम्ही करू, असेही पवार म्हणाले.
यावेळी बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,‘या विमानतळासाठी एक जागा निश्चित झाली असून, त्याला सर्वच विभागांनी मान्यता दिली आहे. परंतु, या जागेसंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्य सरकारतर्फे या प्रश्नांना लवकरच उत्तर दिले जाईल.’
पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असून याकरिता संरक्षणमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक व्हावी, असा प्रयत्न करू’, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “उद्धवजी तुमचे ‘अंगार’ तुम्हाला भंगारा इतकीही किंमत…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- “पाठीशी घालणारे आपलेच सरकार…”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- IPL 2022: ईशान किशनकडून मुंबईतील खेळाडूंचे सिक्रेट उघड; व्हिडीओ व्हायरल
- “भाजपच्या पाठबळामुळेच या…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
- IPL 2022: कोच फ्लेमिंगने केला खुलासा ; सांगितले चेन्नईचे सुरतमध्ये ट्रेनींग करण्यामागील कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

