मुंबई: भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने आयपीएल सुरु होण्याआधी पंजाब किंग्जचा माजी कर्णधार केएल राहुलवर निशाणा साधला आहे. पंजाब किंग्जचे कर्णधारपद सोडल्यानंतर केएल राहुल आणि पंजाब फ्रँचायझी यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर दोघांनी एकमेकांची साथ सोडली. लखनऊ सुपर जायंट्स या नव्या संघाने केएल राहुलला कर्णधार बनवले आहे. दरम्यान, आकाश चोप्राने केएल राहुलच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने (aakash chopra) केएल राहुलवर (KL Rahul) मोठा आरोप करत सांगितले, “पंजाब किंग्ससाठी संथ खेळत होता कारण संघ तसाच होता. तुलाच विचारल्यावर संघाची निवड केली जायची, मला सांगा की तू किती चांगला कर्णधार आहेस, कारण आता तुझ्याकडे कोणतेही निमित्त नाही, कथा नाही. आता मोकळेपणाने खेळ, आता किंवा कधीच नाही, करू किंवा मरो, एवढंच महत्त्वाचं आहे, गौतम गंभीर आणि अँडी फ्लॉवर ही दोन चांगले डोके लावणारे असतील, तु एक चांगला कर्णधार आहेस, तु एक महान खेळाडू आहेस , तु सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न कर.”
केएल राहुलकडे आयपीएलमध्ये अनुभवाची कमतरता नाही. गेल्या मोसमात राहुलने शानदार फलंदाजी केली. पंजाबकडून खेळताना त्याने १३ सामन्यात ६२६ धावा केल्या. त्याच वेळी,२०२० मध्ये, तो १४ सामन्यांमध्ये ६७० धावा करत ऑरेंज कॅपचा दावेदार बनला. राहुलने आतापर्यंत ९४ आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने ३२७३ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी”, काँग्रेसची ‘कश्मीर फाईल्स’ निर्मात्यांना मागणी
- IPL 2022: ईशान किशनकडून मुंबईतील खेळाडूंचे सिक्रेट उघड; व्हिडीओ व्हायरल
- “पाठीशी घालणारे आपलेच सरकार…”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- “उद्धवजी तुमचे ‘अंगार’ तुम्हाला भंगारा इतकीही किंमत…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- IPL 2022: कोच फ्लेमिंगने केला खुलासा ; सांगितले चेन्नईचे सुरतमध्ये ट्रेनींग करण्यामागील कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

