🕒 1 min read
मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२० मार्च) यावर प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
“३७० कलम कसे हटवले हे जनतेला माहिती आहे. पण जेव्हा वसुलीच्या पलीकडे अक्कल चालत नसते तेव्हा असं काही तरी सुचतं. अनिल परब, यशवंत जाधवांकडे घबाड कसं आलं त्यावर बोला, त्यातला किती वाटा तुमच्याकडे आला हेही सांगा.”, असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.
३७० कलम कसे हटवले हे जनतेला माहिती आहे. पण जेव्हा वसुलीच्या पलीकडे अक्कल चालत नसते तेव्हा असं काही तरी सुचतं.
अनिल परब, यशवंत जाधवांकडे घबाड कसं आलं त्यावर बोला, त्यातला किती वाटा तुमच्याकडे आला हेही सांगा pic.twitter.com/jIPQOKDr4b— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 21, 2022
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असे स्पष्टपणे उध्व ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान एमआयएमने दिलेल्या ऑफर नंतर भाजपने शिवसेनेला निशाण्यावर धरले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत भाजपला चांगलेच प्रत्युत्तर दिले. ते काल शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना याबाबत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: कोच फ्लेमिंगने केला खुलासा ; सांगितले चेन्नईचे सुरतमध्ये ट्रेनींग करण्यामागील कारण
- “भाजपच्या पाठबळामुळेच या…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
- महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे- संजय राऊत
- ‘आयपीएलनेच मार्केट बनवलंय’ पाकिस्तानी पत्रकाराला रॉबिन उथप्पाचे सडेतोड उत्तर
- एमआयएमने दिलेल्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक राजकीय…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
