मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना आता काँग्रेस नेते अतुल लोंढे (Congress leader Atul Londhe) यांनी यांनी थेट चित्रपट निर्मात्यांकडे मागणी केली आहे.
“१३ कोटी रुपयांत बनलेला ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने आतापर्यंत १३० कोटी रु. ची कमाई केली आहे, त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी. जर त्यांची खरंच काळजी असेल तर.”, असे ट्वीट अतुल लोंढे यांनी केले आहे. दरम्यान काँग्रेसकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.
13 कोटी रु.त बनलेला #द काश्मीर फाईल# चित्रपटाने आतापर्यंत 130 कोटी रु. ची कमाई केली आहे, त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी. जर त्यांची खरंच काळजी असेल तर.
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) March 21, 2022
त्यामुळे या चित्रपटामुळे राज्यात मविआ विरुद्ध भाजप तर देशात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पहावयास मिळत आहे. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवले जात आहे त्यामध्ये फरक आहे. त्यावेळी देशाचे नेतृत्व हे काँग्रेसकडे नसून विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होते. भाजपच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. तसेच तेथील राज्यपालही काँग्रेसच्या विचारांचे नव्हते.”
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: ईशान किशनकडून मुंबईतील खेळाडूंचे सिक्रेट उघड; व्हिडीओ व्हायरल
- “पाठीशी घालणारे आपलेच सरकार…”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- “उद्धवजी तुमचे ‘अंगार’ तुम्हाला भंगारा इतकीही किंमत…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- IPL 2022: कोच फ्लेमिंगने केला खुलासा ; सांगितले चेन्नईचे सुरतमध्ये ट्रेनींग करण्यामागील कारण
- “भाजपच्या पाठबळामुळेच या…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका


