Share

स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने ‘या’ संघाना आहे पुनरागमनाची संधी

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

स्पर्धा स्थगित झाल्याने स्पर्धेतील अपयशी संघाना त्याच्या कच्च्या दुव्यावर काम करुन पुनरागमन करण्याची संधी आहे. आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर या संघनी पुनरागमन केले तर आश्चर्य वाटायला नको. यात पहिले नाव येते सनरायझर्स हैदराबाद संघाचे. हैदराबाद संघासाठी यंदाची आयपीएल स्पर्धा ही फारच निराशाजनक ठरली. स्पर्धेतील ७ सामन्यातपैकी केवळ एकच सामन्यात हैदराबाद संघ विजय मिळवु शकला.

स्पर्धा रद्द होण्या अगोदर डेव्हिड वॉर्नरच्या वादामुळे संघ व्यवस्थापनावर भरपुर टिका झाली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी संघाला पुरेसा अवधी मिळाला आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलला शस्त्रक्रियेनंतर पुरेसा आराम करण्याची संधी मिळेल. राजस्थान रॉयल्स संघाचा युवा कर्णधार संजु सॅमसनसाठी तर पुनरागमन करण्याची नामी संधी आहे. कारण जे खेळाडू स्पर्धेबाहेर झाले होते. ते पुन्हा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थान संघ पुन्हा मुंसडी मारु शकतो असे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!