🕒 1 min read
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांच्याद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. केंद्र सरकारने लक्ष घालावे, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. ‘ पंतप्रधानांनी काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय,’ असं विधान ठाकरेंनी केलं असून उद्या केंद्र सरकारला या संदर्भात एक पत्र लिहून मागणी करणार असल्याचंही ठाकरे म्हणाले आहेत.
प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 5, 2021
उद्धव ठाकरेंच्या या आव्हानानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला…प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून. सर्व काही केंद्र सरकारने करावे, आम्ही फक्त घरी बसून वसूली करणार…’ असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला आहे.
सर्व काही केंद्र सरकारने करावे, आम्ही फक्त घरी बसून वसूली करणार…#मराठा_आरक्षण
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 5, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘निवडणुका घेता, आयपीएल खेळवता; मग परीक्षाही घ्या’, ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी
- देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच; वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांचा इशारा
- अनवाणी धावून पतीला वाचवलं, पण अखेर कोरोनाने हिरावलं !
- पुन्हा उसळणार ! उद्या मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक…
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा परिणाम! रेल्वेकडे फिरवली प्रवाशांनी पाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
