🕒 1 min read
औरंगाबाद : ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या डोससाठी मात्र फर्दापूर (ता.सोयगाव) येथील ज्येष्ठ नागरीकांची चांगलीच फरफट होतांना दिसत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चाळीस दिवसांचा कालावधी उलटून जावून ही अद्यापपर्यंत फर्दापूर येथील ज्येष्ठ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला नाही.
जेष्ठ नागरीकांना लसीचा दुसरा डोस मिळतो की नाही असा प्रश्न नाजिकांना पडल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने होतांना दिसत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. या पाश्र्वभूमीवर दि.२४ मार्च रोजी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.
जवळपास तीनशे हून अधिक ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांनी लसीचा पहिला डोस लसीकरणाच्या पहिल्या टप्यात घेतल्याचे दिसून आले. यावेळी पहिल्या डोसनंतर अठ्ठेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला दुसरा डोस दिला जाईल अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांना देण्यात आली होती.
दरम्यान, फर्दापूर येथे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस घेऊन एकेचाळीस दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र, तालूका आरोग्य विभागाच्या वतीने येथील ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना अद्यापपर्यंत लसीचा दुसरा डोस देण्यात आला नाही त्यातच दुसरा डोस कधी व कोठे देणार या बाबत कोणतीही सूचना व माहिती देण्यात आलेली नाही परिणामी लसीचा पहिला डोस अगदी सहजतेने उपलब्ध झालेल्या फर्दापूर येथील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांची दुसरा डोस मिळवण्यासाठी चांगलीच फरफट होतांना दिसत असून येथील ज्येष्ठ नागरीक अत्यंत व्याकूळ होवून दुसऱ्या डोस ची प्रतीक्षा करतांना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
