🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशी परतु लागले. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने मायदेशी इंग्लंडला परतण्यापुर्वी त्याचा सलामीवीर भारताचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला एक बॅट भेट म्हणुन दिली आहे. या बॅटवर बटलरने ‘स्वत:च्या प्रतिभेचा आंनद घे, खुप खुप शुभेच्छा’ असा संदेश लिहीला आहे. यशस्वी जैस्वालने हा ‘भेटी’चा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटला यशस्वीने ‘विशेष भेटवस्तु एका खास सलामी जोडीदाराकडून’ असे कॅप्शन दिले आहे.
A special gift from a special opening partner. ????#HallaBol | #RoyalsFamily | @yashasvi_j | @josbuttler pic.twitter.com/VE3QIE0kct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 4, 2021
ही भेट पाहून यशस्वी जयस्वाल खूप खुश झाला आहे. राजस्थान रॉयल्सकडुन यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी या हंगामात सलामीला फलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांची खूप चांगली मैत्री झाली आहे आयपीएल स्पर्धा ही अनेक युवा आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकत्र खेळण्याची संधी देते. यामुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडुसोबत खेळण्याचा अनुभव मीळतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर तोंड काळे करा आणि कडी लावून निवांत घरी बसा’
- ‘पंतप्रधानांनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा परिणाम! रेल्वेकडे फिरवली प्रवाशांनी पाठ
- लसीकरणाला अडथळा! जेष्ठ लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- ‘सर्वोच्च न्यायालयाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
