🕒 1 min read
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांच्याद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. केंद्र सरकारने लक्ष घालावे, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. ‘ पंतप्रधानांनी काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय,’ असं विधान ठाकरेंनी केलं असून उद्या केंद्र सरकारला या संदर्भात एक पत्र लिहून मागणी करणार असल्याचंही ठाकरे म्हणाले आहेत.
‘निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला ?’
‘निकालपत्र हाती आलंय, त्याच्यावरती काम सुरू आहे. सर्वांनी एकमतानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात हरला, असं कोणी तरीम्हणालं. तुम्हाला लढताच आलं नाही. त्यांना सांगू इच्छितो, ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयात विजय प्राप्त करून दिला, बाजू मांडली, तेच वकील किंबहुना त्यात कोणताही बदल न करता ही लढाई समर्थपणाने सर्वांचं मत एकत्र घेत आपण ही लढलोय.
पदरी निराशा आलेली आहे. निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला. मी मराठा समाजाला एक वेगळ्या दृष्टीनं धन्यवाद देतोय. त्यांनी फार समंजसपणानं हा निर्णय स्वीकारलेला आहे. कुठेही थयथयाट केला नाही, आदळआपट केली नाही, त्याबद्दल मराठा बांधव माता-भगिनींना हात जोडून धन्यवाद देतोय.’ असं देखील उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘निवडणुका घेता, आयपीएल खेळवता; मग परीक्षाही घ्या’, ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी
- देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच; वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांचा इशारा
- अनवाणी धावून पतीला वाचवलं, पण अखेर कोरोनाने हिरावलं !
- पुन्हा उसळणार ! उद्या मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक…
- महसूल विभागाचा जावईशोध! म्हणे, पैठणचा हिरडपुरी बांध हा बीड जिल्ह्याच्या हद्दीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
