Share

मोदींनी नक्की कोणाचं ऐकलं ? ठाकरे बंधू आमने-सामने !

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन देखील केलं आहे. या सोबतच, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने महाराष्ट्राला अतिरिक्त लस पुरवठा करण्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या हाफकिन संस्थेला लस निर्मती करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत देखील त्यांनी मागणी केली होती.

आता हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.

फक्त उद्धव ठाकरेच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हाफकीन, हिंदुस्तान अन्टिबायोटिक यांना देखील लस निर्मितीची मुभा मिळावी अशी मागणी केली होती. अखेर केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी आपल्याच मागणीला यश आल्याचा दावा केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत लसीचा तुडवडा जाणवत असल्याने निर्णय घेतला असला तरीदेखील दोन्ही ठाकरे बंधू आपलीच मागणी मान्य झाल्याचा धिंडोरा पिटवत आहेत. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

‘हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.’

काय म्हणाले राज ठाकरे

‘१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की’.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!