औरंगाबाद : कोहिनूर कला व वाणिज्य महाविद्यालय खुलताबाद येथे बीकॉमच्या मराठी विषयाच्या पेपर दरम्यान प्राध्यापकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते. हा प्रकार आला समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी आता करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिले आहे. या चौकशीसाठी तीन जाणांचे एक पथक लवकरच कोहिनूर महाविद्यालयामध्ये पाठवण्यात येणार असल्याचे देखील या वेळी सांगण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बीए, बीएससी व बीकॉमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षादरम्यान कोहिनूर कला व वाणिज्य महाविद्यालयात सुरू असलेला धक्कादायक प्रकार आहे. या सर्व प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासन तसेच परिक्षा विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार खुपच गंभीरपणे घेऊन लवकरच कारवाई करण्यात येईल, असे या वेळी परिक्षा विभागाने प्रसार माध्यमांना सांगितले.
कोहिनूर कला व वाणिज्य महाविद्यालय खुलताबाद मधील घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. बाबासोहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तीन जणांचे पथक देखील नेमले आहे. हे पथक आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर लवकरच कोहीनूर महाविद्यालयात जाणार आहे. तेथे जावून सर्व प्रकार समजून घेणार आहे. तसेच यातील दोषींचा शोध घेवून त्याला कायद्यानुसार शिक्षा कशी देता येईल यावर विद्यापीठाच्या परिक्षा विभाग यावर चर्चा करत आहेत. आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’


