Share

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते, धनंजय मुंडेंचे पंकजांना प्रत्युत्तर

Published On: 

बीड: राज्यात लसीकरण थंडावलेले असतांना, बीडचे राजकारण मात्र तापले आले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कोरोना लसीवरुन शाब्दिक युद्ध सुरु झाल्याचे दिसून येत आहे. अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रितमा मुंडेंच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याचे बोलले जात आहे, केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्रात तुटवडा जाणवत आहे. त्यात पंकजा मुंडे यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून लसीकरण सुरळीत पार पाडण्याची व रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणीवर उत्तर देताना धनंजय म्हणाले, ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो. पुढे ट्विट करत धनंजय यांनी लसीकरणाबाबत संपूर्ण माहिती देत, पंकजांना मुंडे यांना नाव न घेता टोला लावला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!