Share

‘ये राऊत की खुर्सी लेकर ही मानेगी’ ; कंगणाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

साहजिकच या लॉकडाऊनला बऱ्याच नागरिकांचा विरोध दिसतव आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा या लॉकडाऊनला विरोध आहे. दरम्यान, तिने एक ट्विट करत राज्यातील लॉकडाऊनची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनाने एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत एका दरवाज्यावर कुलूप लागलेले दिसत आहे. मात्र त्या घराला चारही भिंती नाहीयेत. कंगनाने या घराची तुलना महाराष्ट्रातील लॉकडाऊनशी केली आहे.

पण कंगनाला हि खिल्ली उडवणं महागात पडलं आहे. या ट्विटमुळे कंगणाचीचं खिल्ली उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या पोस्टची अनेकांनी मजा घेतली कंगनाची पोस्ट वाचून नेटक-यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात. संजय राऊतांची खुर्ची केल्याशिवाय ही नाही मानणार, असे एका युजरने कंगनाची मजा घेत लिहिले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!