पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना गरीब, गरजू व हातावर पोट असलेल्या घटकांसाठी मदतीची घोषणा देखील केली. तर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी देखील मोफत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १३ एप्रिल रोजी शिवभोजन थाळी पुढील १ महिना मोफत देण्याची घोषणा केली होती. यानंतर, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू झाल्यानंतर १५ एप्रिल पासून शिवभोजन थाळी मोफत मिळणे अपेक्षित होते. मात्र, पुण्यात गरिबांना दोन दिवस या थाळीसाठी पैसे मोजावे लागले आहेत. यासाठी कारणीभूत ठरला तो सरकार आणि प्रशासनाचा गलथान कारभार ! वेळीच जीआर प्राप्त न झाल्याचे सांगत शिवभोजन केंद्रांनी पैसे आकारणी केली.
दरम्यान, दुपारनंतर आलेल्या या जीआरमध्ये १५ एप्रिल पासून पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, जीआर योग्य वेळी न आल्याने गरजुंना पैसे देऊनच थाळी घ्यावी लागली असल्याने या कारभाराला जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे. आता, हा जीआर आल्याने १६ एप्रिल म्हणजेच आज पासून ही थाळी मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती मिळत आहे.
खरे पहिले तर सध्याच्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याबरोबर ज्या विभागाशी संबंधित घोषणा झाल्या त्या विभागाने जीआर आणि तत्सम कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न घडल्यामुळे घोषणा होऊन देखील गरिबांना भुर्दंड भरावा लागला. याशिवाय शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास दाखवत गरिबांना मोफत थाळी दिली असती तर विशेष काही फरक पडला नसता. मात्र, केंद्र चालकांचाही सरकारवर भरोसा नाही की काय असा देखील सवाल या प्रसंगामुळे उपस्थित होऊ लागला आहे.
- पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
- पत्नी सोबत वेळ घालवता यावा म्हणून अनुपम खेर यांनी अमेरिकन सीरिजला ठोकला रामराम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

