Share

चाकूर तालुक्यात १०० बेड रुग्णालय करीता प्रस्ताव सादर करा- अमित देशमुख

Published On: 

लातूर: राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. वाढत्या कोरोनाला थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना शासन तसेच स्थानिक प्रशासन करत आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी चाकूर तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भट दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या आणि आरोग्य व जिल्हा प्रशासन यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील चाकूर इथल्या कृषी महाविद्यालय कोविड केअर सेंटरची पाहणी केली. या वेळी येथील रुग्णांना उपलब्ध आरोग्य सुविधा व उपाययोजनांची पाहणी करून माहीती घेतली. चाकूर तालुक्यात ८६४ रुग्ण उपचार घेत असून तालुक्यात २४ ठिकाणी रुग्ण तपासणी केली जात आहे.

चाकूर तालुक्यातील रुग्ण तपासणी संख्या कमी असून तपासणीचा वेग सध्याच्या तपासणीच्या तुलनेत दहा पट अधिक वाढवावा, परवानगी नसताना व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी, तालुक्याच्या ठिकाणी किमान १०० बेड रुग्णालय असावे याकरीता प्रस्ताव तयार करावा, कोरोना मुक्त गाव अभियान राबवून शासन स्तरावर पुरस्काराने सन्मान असा उपक्रम राबवावा, एकूण बाधित रुग्णांची विविध घटकातील वर्गवारी काढून त्या त्या घटकात जनजागृती करावी, २५ पेक्षा रुग्ण असलेल्या गावात संस्थात्मक विलगिकरण सुरू करण्यात यावे, अशा सूचना या वेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज व इतर अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!