Share

आज पासून चीनची राजधानी बीजिंग मध्ये हिवाळी ऑलिम्पिकची सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

बीजिंग : २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात टोकियो ऑलिम्पिक संपन्न झाले. त्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत १ सुवर्ण, २ रजत पदक आणि ४ कांस्य पदक जिंकली. या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताने आतापर्यंतची सर्वात यशस्वी कामगिरी करत जगात पदकतालिकेत ऐतिहासिक ४८ वे स्थान मिळवले. त्यानंतर झालेल्या टोकियो दिव्यांग ऑलिम्पिक मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य पदक जिंकत जगभरात पदकतालिकेत ऐतिहासिक असे २३ वे स्थान प्राप्त केले.

तर ऑलिम्पिक स्पर्धेत फारसे कोणाला माहिती नसणारे हिवाळी ऑलिम्पिकला आज पासून चीनची राजधानी बीजिंग येथे सुरुवात होणार आहे. जगभरातील सर्व क्रीडा प्रेमींचे डोळे चीनची राजधानी बीजिंग येथे लागून राहिले आहेत. या स्पर्धेची सुरुवात बर्ड नेस्ट स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्यासह होणार आहे.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक २०२२ ला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. युरोपातील चार देशांनी स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यानंतर, अखेर बीजिंगने समस्येवर तोडगा काढला. कझाखस्तानही स्पर्धेत होता. पण अखेर आयओसीने बीजिंगला यजमान म्हणून निवडले. पुढील अडीच आठवडे जगभरातील क्रीडा रसिकांना ९० देशांच्या २९०० खेळाडूंची स्कीईंग, स्केटिंग आणि स्लायडिंगची रोमहर्षक कौशल्ये पाहायला मिळणार आहेत. आज होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यास भारत निषेध म्हणून अनुपस्थित राहणार आहे.

         महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!