🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा शाब्दिक वाद उद्या चव्हाट्यावर येणार आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी उद्या पुण्यात संजय राऊत यांचे सगळे उद्योग-धंदे बाहेर काढणार असा ईशारा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला.
पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, मी उद्या संध्याकाळी ४ वाजता पुण्यात येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय राऊत यांचे सगळे उद्योग धंदे जनतेसमोर आणणार आहे. संजय राऊत, सुधीर पाटकर आणि प्रवीण राऊत हे सगळे काय काय उद्योग-धंदे करतात हे सर्व जनतेसमोर मी उद्या आणणार आहे असेही सोमय्या म्हणाले.
यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, मला, माझ्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला आणि सहकाऱ्यांना कारण नसताना लक्ष केले जात आहे. माझ्यावरचे सर्व आरोप राजकीय हेतूने केले जात आहेत. विरोधी पक्ष अत्यंत खालच्या थराचे राजकारण करत आहे. पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी मी तुरुंगातच काय मरायला सुद्धा तयार आहे असे मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंची प्रकृती बिघडली; रुग्णालयात ठेवण्याची वकिलाची मागणी
- “वाईन पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं…” सुजय विखे पाटलांचा टोला
- चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पुत्रशोक झालेल्या आमदार विजय रहांगडालेंचे सांत्वन
- पाकिस्तानच्या अजून एका जलतगती गोलंदाजावर बंदी
- ऐतिहासिक औरंगाबादला ८ दिवसाला पाणीपुरवठा; सरकारमधील मंत्री काय करतात? राज्यपाल कोश्यारी यांची खंत!

