Share

Kiran Mane : किरण मानेंनी ठोकला ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकल्यानंतर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत वकील असिम सरोदे देखील उपस्थित होते. ‘माझ्यावर केलेले आरोप खोटे, सत्य लवकरच समोर येईल’, असे किरण माने यांनी यावेळी म्हटले आहे.

अब्रू नुकसानीचा दावा

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेत ‘विलास पाटील’ हे पात्र साकारणाऱ्या ‘किरण माने यांना अचानक काढुन टाकण्यात आले. तसेच याबद्दल सोशल मीडियावर सर्वच स्तरावर चर्चा झाली. मात्र नुकतच झालेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ‘पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा हाच आहे की, मला मेल किंवा नोटीस का देण्यात आलेली नाही? अचानक एक हिंदी प्रोडक्शन हाऊस मला सांगतं की, काढून टाकण्यात आलं आहे. माझ्यावर आरोप करण्यात आला आहे की, महिलांबाबत गैरवर्तन केलं आहे. हे आरोप धादांत खोटे आहेत’, असे किरण माने म्हणाले. प्रोडक्शन हाऊसकडून कोणत्याही प्रकरचे कायद्याचे प्रमाण वाढत आहे. किरण माने यांच्या प्रकरणात महिलांच्या तक्रारी आहेत, असं सांगून करवाई झाली आहे.

या प्रकरणामध्ये चॅनलने किरण माने यांच्यावर करवाई करणं गरजेचं होतं, हे का केलं नाही. या प्रकरणी चॅनलने संबंधित तरुणीची तक्रार घेणं गरजेचं होतं आणि तत्काळ किरण माने यांना नोटीस द्यायला होती. यापैकी कोणतीही बाब पाळली गेली नाही. त्यांनी जाणीपूर्वक या बाबी केल्या आहेत आणि अतिशय वाईट पद्धतीन किरण माने यांना काढण्यात आलं आहे. त्यांची बदनामी केली. म्हणून पॅनोरमा प्रोडक्शन यांना ५ कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे. शिवाय त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्याना सन्मानाने परत घ्यावं आणि लेखी माफीनामा मागावा अन्यथा आम्ही कोर्टात जाणार आहोत’, असे वकील असिम सरोदे म्हणाले.

यावेळी त्यांनी जातीवादावर देखील भाष्य केले. एक हिंदी प्रोडक्शन मराठी कलाकाराला कामावरून काढून टाकते आणि त्याची बदनामी करते, अशावेळी मराठी कलाकारांनी पुढे येऊन साथ द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. तर, स्टार नेटवर्कने पॅनोरमा प्रोडक्शनवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी कायदेशीर नोटीसीत केली आहे. आता यापुढे काय वळण येणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!