🕒 1 min read
पुणे: पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून (Pune Building Slab Collapse) पाच कामगारांचा मृत्यू झाला. सर्व कामगार परराज्यातील या घटनेतील सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर भागात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे हे दुर्दैवी,क्लेशदायक आहे.मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.सदर कुटुंबियांना शासनाकडून पाच लाख रु. मदत देण्यात येईल.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 4, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले, हे दुर्दैवी, क्लेशदायक घटना आहे. तसेच पवारांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
INDVSWI: भारत बनणार १००० एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला देश
-
VIDEO : अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
