🕒 1 min read
पाकिस्तानच्या अनेक गोलंदाजांवर चुकीच्या बॉलिंग ऍक्षन मुळे बऱ्याच वेळा कारवाई झाली आहे. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तर असो वा फिरकीपटू सईद अजमल असो पाकिस्तानच्या अनेक गोलंदाजांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गोलंदाजी करायला बंदी घातली आहे. यातच अजून एका पाकिस्तानी जलदगती गोलंदाजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित केलया जाणाऱ्या बिग बॅश लीग या क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानच्या हम्मद हसनैन या पाकिस्तानच्या जादगती गोलंदाजांवर बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत फेकी गोलंदाजी केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.
लाहौर येथे झालेल्या बायमेक्निकल टेस्टध्ये त्याची गोलंदाजीची शैली अवैध सापडली आहे त्यामुळे हम्मद हसनैन वर बंदी घालण्यात आली आहे. मागील महिन्यात हसनैन याने सिडनी थंडर्सकडून बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या अचूक आणि प्रभावशाली गोलंदाजीमुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. तो अचूक टप्यावर गोलंदाजी करायचा. मात्र या बिग बॅश लीग मध्ये खेळतानाच त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, विरुद्ध संघाच्या अनेक खेळाडूंना आणि मैदानावर असणाऱ्या पंचांना पण हम्मद हसनैनची गोलंदाजीच्या शैलीवर शंका येत होती.
२१ जानेवारीला लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स येथे त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली. हसनैन जेव्हा गुड लेंथ, फुल लेंथ, बाऊन्सर किंवा स्लो बाऊन्सर फेकतो तेव्हा त्याचा हाताचा कोपरा आयसीसीच्या १५ डिग्री नियमांचे उल्लंघन करतो. हसनैन सातत्यानं १४५ Km च्या वेगाने चेंडू फेकतो त्यामुळे त्याचे जगभरातून कौतुक होत होते. मात्र त्याच्या अवैध शैलीमुळे त्याला आता बंदीला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावरील बंदीचा अर्थ असा की या २१ वर्षीय गोलंदाजाला पुढील महिन्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळता येणार नाहीये. शिवाय त्याला आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळता येणार नाहीये. त्याला आता गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करावी लागणार आहे नाहीतर याला अजून बंदीला सामोरे जावे लागणार आहे.
२ जानेवारीला हसनैनच्या गोलंदाजीबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याने आतापर्यंत १८ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांसह ७० सामने खेळले आहेत. त्याने ८ वन डे सामनेही खेळले आहेत. बीबीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने एडिलेड स्ट्रायकर्सच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. हसनैनवर कधीपर्यंत बंदी असेल याची स्पष्टता झालेला नाही. आयसीसीच्या नियमानुसार त्याची शैली योग्य ठरताच तो गोलंदाजी करू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
- ऐतिहासिक औरंगाबादला ८ दिवसाला पाणीपुरवठा; सरकारमधील मंत्री काय करतात? राज्यपाल कोश्यारी यांची खंत!
- विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला एक दिवसाची पोलीस कोठडी
- INDVSWI: भारत बनणार १००० एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला देश
- पुणे महानगरपालिकेतर्फे ” लोकशाही दिनाचे आयोजन”
- नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
