Share

चित्रा वाघ यांनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचे कॉंग्रेसने केले तोंडभरून कौतुक

Published On: 

मुंबई : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिला नेत्यांसोबतच्या पोलीस वर्तनावर तीव्र आक्षेप घेतले आहेत .काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. चित्रा वाघ यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.’

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, चित्राताई, आपण एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र आपलं बोलणं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऐकतील का?. हा प्रश्न आहेच. पण एक मात्र खरं, पक्ष बदलला असला तरीही तुम्ही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत. याचा अभिमान असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!