Share

शाळा सुरु कधी होणार ? राज्यमंत्री बच्चू कडू म्हणतात…

Published On: 

अमरावती – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच शासकीय आणि खाजगी शाळा, महाविद्यालय अद्यापही बंद आहे. मात्र दिवाळीनंतर राज्यातल्या इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यतच्या शाळा सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावती इथं दिली.

कोरोना काळातील सर्व नियम आणि अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, असंही ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदी नंतर आता राज्यात अनलॉक प्रक्रीया सुरू आहे. जवळपास सर्व बाबी खुल्या करण्यात आल्या असल्या, तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

शाळा सुरु करताना सरकारच्या वतीनं एक चांगल धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. एखाद्या शिक्षकाचं वय 50 च्या पुढे असेल तर त्या शिक्षकाऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का ? तसंच बाधित मुलं शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का ? असाही विचार सुरू असल्याचे कडू म्हणाले.

दरम्यान, राज्यात काल कोरोनाचे १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!