Share

चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांचा राजकीय गेम शहा करत आहेत – राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई – चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांचा राजकीय गेम अमित शहा करत आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

बिहारच्या निवडणूकीत लोकजनशक्ती हा पक्ष जनता दल युनायटेड यांच्यापासून विभक्त होवून केंद्रातील आघाडी भाजपसोबत आहे असं त्यांनी जाहीर केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांना अडचणीत आणून सत्तेतून बेदखल करण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

बिहारच्या निवडणूकीच्या समीकरणात नितीशकुमार हे कुठेच नसतील आणि त्यांचे खच्चीकरण करण्याची जबाबदारी बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

भाजप गुप्तपणे चिराग पासवान यांच्या उमेदवारांना मदत करेल आणि जनता दल युनायटेडचे उमेदवार पाडण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करेल जेणेकरून बिहारचे समीकरण बदलेल अशा प्रकारची रणनीती भाजप आखण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!