🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.
चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिला नेत्यांसोबतच्या पोलीस वर्तनावर तीव्र आक्षेप घेतले आहेत .काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. चित्रा वाघ यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
पुरुष पुलिस की जुर्रत कैसे हुई कि वो एक महिला नेता के वस्त्रों पर हाथ डाल सके!समर्थन मे अगर महीलाए आगे आ रही है पुलीस कही की भी हो उन्हे अपनी मर्यादा का ध्यान रखना ही चाहीए
भारतीय संस्कृती मे विश्वास रखनेवाले मुख्यमंत्री @myogiadityanath जी ऐसे पुलीसवालोपर सख्त कारवाई करे @dgpup pic.twitter.com/RfbXiIIXcI— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2020
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.’
महत्वाच्या बातम्या :-
- दिग्विजय सिंह यांची कन्या शूटर श्रेयसी सिंहचा भाजपमध्ये प्रवेश
- शाळा सुरु कधी होणार ? राज्यमंत्री बच्चू कडू म्हणतात…
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांचा राजकीय गेम शहा करत आहेत – राष्ट्रवादी
- पंढरपूरजवळ साकार झाली आहे एक स्वप्ननगरी; ४२ एकर क्षेत्रात अतीशय सुंदर तयार केले ‘ड्रीम गार्डन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
