पटना- बिहारमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी काल (४ ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत. काल त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे.
श्रेयसी सिंह यांची आई पुतुल सिंह खासदार होत्या. त्यांचे वडील दिग्विजय सिंह जॉर्ज फर्नांडीस यांचे सहकारी आणि जनता दलाचे नेते होते. काही काळाने ते समता पार्टीत गेले होते.
श्रेयसी सिंह बांकातील अमरपुर किंवा जमुई विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याआधी श्रेयसी सिंह राष्ट्रीय जनता दलमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती.
दरम्यान,श्रेयसी राष्ट्रीय स्तरावरची नेमबाज आहे. 2018 च्या कॉमनवेल्थ गेममध्ये तिला सुवर्ण पदक पटकावले होते. 2014 साली श्रेयसी यांच्या आई पुतुल देवी भाजपच्या तिकिटीवर लोकसभा निवडणुक लढल्या आणि जिंकल्या.
Shooter Shreyasi Singh (in file photo) to join BJP today. She is the daughter of former union minister late Digvijay Singh. pic.twitter.com/mrP3QIoqAC
— ANI (@ANI) October 4, 2020
2019 साली ही जागा जदयुकडे गेली म्हणून पुतुल देवी नाराज झाल्या आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबीत केले होते. यंदा श्रेयसीही राजकारणात येणार अशी बातमी होती. त्या राजदमध्ये सामील होती असा अंदाज होता, पण त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- राज्यात आजपासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट होणार सुरु,जाणून घ्या काय आहे हॉटेलबाबत नियमावली?
- गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले?
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांचा राजकीय गेम शहा करत आहेत – राष्ट्रवादी
- मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा करणारी कंगणा राणावत हाथरसच्या प्रकरणावर म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

