Share

कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. याप्रकरणी सीबीआयनं कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या.

सीबीआयच्या टीमने बंगळुरूमधील शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्याशी संबंधीत असलेल्या 15 इमारतींवर सुद्धा छापे मारले आहे. यात डोडालाहल्‍ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर मधील काही जुन्या घरांचाही यात समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालय (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाकडून टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. याच दरम्यान ईडीच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली होती. त्यानंतर ईडीने ही माहिती सीबीआयला दिली. त्यातून सीबीआयने आज सोमवारी छापे मारले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!