मुंबई – देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मास्टर स्ट्रोक लगावला. या मंत्रालयामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यातच दिल्ली दरबारी गेलेल्या फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना यापुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांत गैरव्यवहार झाल्याचं सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- टी-२० विश्वचषक! प्रबळ दावेदारच होऊ शकतात पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

