Share

अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास

Published On: 

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवान आहे. मात्र नागपूर कारागृहातून अरुण गवळी बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

तो चक्क कारागृहातून आपलं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. अरुण गवळी हा सध्या नागपूर कारागृहातून शिक्षणाचे धडे गिरवत आहे. अरुण गवळीने  आपल्या शिक्षणासाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. बीएमध्ये अरुण गवळी ने ‘द स्टडी ऑफ सोसायटी सोसायटी इन इंडिया फाउंडेशन कोर्स इन हुम्यानिटी अँड सोशल सायन्स यासारख्या विषयांची निवड केली आहे.

सध्या अरुण गवळी बीएच्या अंतिम वर्षात आहे. परीक्षेत अरुण गवळी पाच पैकी तीन विषयात चांगल्या गुणाने पास देखील झाला आहे. या मुक्त विद्यापीठात प्रवेश देण्याआधी त्याने अभ्यासक्रमाविषयी आणि परीक्षेच्या प्रक्रियेविषयी चौकशी केली. त्यानंतर अरुण गवळीने बीएचे विषय निवडल्याचं विभागीय संचालक डॉ पी शिवस्वरूप यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!