औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) मंडळाची १४ वी बैठक शुक्रवारी झाली. बैठकीत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), रस्ते परिवर्तन आणि ऐतिहासिक गेट, त्याच बरोबर व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर या प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी मास्टर सिस्टम इंटिग्रेटर (एमएसआय) प्रकल्प, हेरिटेज गेट आणि आणि शाहगंज क्लॉक टॉवर संरक्षण, जीर्णोद्धार आणि सुशोभिकरण, सफारी पार्क प्रकल्प, ऑपरेशन कमांड सेंटर आणि एएससीडीसीएल मुख्यालय बांधकाम, स्मार्ट सिटी बस डेपो, क्रांती चौक उड्डाणपूल खालच्या जागेचे सुशोभिकरण, मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रातील दुरुस्तीचे काम, लव्ह योर सिटी, संत एकनाथ रंगमंदिराचा स्टेजचा विकास व प्रकाशयोजना अशा विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांची प्रगती व स्थिती याबद्दल मंडळाला माहिती दिली. मनपाने औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पात स्थानिक स्वराज्य संसथेचा वाटा म्हणून ६८ कोटी रुपयांचे योगदान केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह ह्यांची नवीन एएससीडीसीएल मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिलीच बोर्ड बैठक होती. या वेळी एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मंडळाचे स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, ऑरिक इंडस्ट्रियल सिटीचे एमडी रंगा नाईक, एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, एएससीडीसीएलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम आणि औरंगाबाद महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

