मुंबई : युएई येथे होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या गटाची घोषणा शुक्रवारी १६ जुलै रोजी आयसीसीने केली. यात एकुण चार गट विभागले आहेत. यातील पहिले दोन ग्रुप पात्रता फेरीसाठी खेळणार आहे. तर दुसरे दोन ग्रुप जेतेपदासाठी
अंतिम १२ संघाच्या गटातील ‘ग्रुप १’ या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणले जात आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका या संघाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पात्रता फेरीतील २ संघाचा समावेश या गटात होईल. मात्र या संघातील केवळ २ संघाना पुढील फेरीत प्रवेश मिळवता येईल. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे प्रबळ दावेदारच पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता आहे.
सद्य स्थितीत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन संघाची कामगीरी पाहता हे दोन्ही संघ पुढील फेरीत प्रवेश मिळवतील. ऑस्ट्रेलिया जरी बलाढ्य संघ असला तरीही टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची कामगीरी निराशाजनक राहिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका गमावली आहे. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचा संघाची स्थितीही ऑस्ट्रेलियासारखी असेल. दक्षिण अफ्रिकेला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे आव्हान पेलायला अवघड जाणार असे वाटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

