Share

स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) मंडळाच्या चौदाव्या बैठकीत महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे स्मार्ट औरंगाबादचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंडळाने एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) साठी निविदा काढण्यास मान्यता दिली आहे.

या बरोबरच मंडळाने एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) साठी निविदा काढण्यासाठी, डिजिटल आउटडोअर डिस्प्लेवर जाहिरातीसाठी निविदा, २५ जंक्शनवर स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसविणे, लाईटहॉउस कौशल्य विकास केंद्रासाठी सिडको एन-५ कम्युनिटी सेंटरचा विकास, क्रांती चौक उड्डाणपुलाखालील जागेचा सुशोभीकरण, मौलाना आझाद संशोधन केंद्राचे नूतनीकरण, संत एकनाथ रंगमदीरचे स्टेज व लाईटिंग, स्ट्रीट्स ट्रान्सफॉर्मेशन, ओसीसी इमारतीवरील सौर उर्जा प्रकल्प, सफारी पार्ककडे जाणऱ्या रस्त्यासाठी अधिग्रहण व बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या दुरुस्तीसाठी निविद प्रक्रियेला मंजुरी दिली. संत तुकाराम नाट्यगृह यांचे नूतनीकरण व व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटरची निविदा प्रक्रियेलाही मंजुरी देण्यात आली.

एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेच्या संदर्भात, ऑरिक एमडी रंगा नाईक यांनी असे क्षेत्र प्रस्तावित केले आहेत, ज्यात दोन्ही स्पेशिअल पर्पस वेहिकल (एसपीव्ही) सेवा आणि प्रकल्प सुधारण्यासाठी एकमेकांना सहकार्य करू शकतात. स्मार्ट सिटी बस सेवेमध्ये औरिकचा समावेश, सार्वजनिक वाहतुकीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे एकत्रीकरण, औरंगाबाद महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन सेवांमध्ये ऑरिकचे कव्हरेज, एएससीडीसीएलच्या डिजिटल आऊटडोअर डिस्प्लेवरील सामग्री व्यवस्थापन आणि शहराच्या संसाधनांचे वाटप यासाठी त्यांनी एएससीडीसीएलकडे मागणी केली. ह्याच्यावर बोर्डचे अध्यक्ष बलदेव सिंग म्हणाले की पुढे चर्चा करून दोन्ही संस्थेमध्ये सामंजस्य करार करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!