मुंबई : युएई येथे होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या गटाची घोषणा शुक्रवारी १६ जुलै रोजी आयसीसीने केली. यात एकुण चार गट विभागले आहेत. यातील पहिले दोन ग्रुप पात्रता फेरीसाठी खेळणार आहे. तर दुसरे दोन ग्रुप जेतेपदासाठी
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अंतीम लढत ही १२ संघात होणार आहे. या १२ संघातील ८ संघ हे थेट खेळतील तर इतर चार संघाना पात्रता फेरी पार केल्यानंतर अंतिम फेरीत स्थान मिळेल. पात्रता फेरीतील पहिला गट आहे ‘ग्रुप A’ या गटात श्रीलंका, आर्यलँड, नेदरलँड आणि नामिबीया हे संघ आहेत. तर ‘ग्रुप B’मध्ये बांग्लादेश स्कॉटलँड, पापुआ न्यु गुणेआ आणि ओमान हे संघ आहेत. या दोन्ही गटातील अव्वल चार संघ अंतिम १२ मध्ये प्रवेश करतील.
ICYMI: The groups for the #T20WorldCup have been revealed.
Get to know the 16 teams duking it out for the trophy at this year’s tournament ???? https://t.co/K6iQjFYa6z pic.twitter.com/46TXHVJoKZ
— T20 World Cup (@T20WorldCup) July 16, 2021
तर मुख्य गटात भारताचा समावेश ‘ग्रुप २’ मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये भारताव्यतिरिक्त न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. यामुळे हे नक्की झाले आहे की यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार. तर ‘ग्रुप २’ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलीया, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’


