Share

‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बांग्लादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या अपयाशाची मालिका सुरुच आहे. २४ जुन रोजी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५ गडी राखुन विजय मिऴवला. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्याचा निकाल हा डकवर्थ लुईस या नियमाच्या आधारे लावण्यात आला.

या सामन्यात सॅम करनने फुटबॉल कौशल्य पणाला लावुन श्रीलंका संघाचा सलामीवीर फलंदाज धनुष्का गुणातिलाकाला धावबाद केले. हा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर सॅम करनने हे ट्विट रिट्विट करत ‘मंगळवारी होणाऱ्या आगामी सामन्यात संघात स्थान मिळेल का?’ असा प्रश्न करताना इंग्लंडच्या फुटबॉल संघातील हॅरी केन, रहिम स्टरलिंग, गॅरी नेवीले या खेळाडुंना टॅग केले आहे. त्याने हा प्रश्न इंग्लंडच्या फुटबॉल संघाला विचारला आहे.

यादरम्यान युरो कप स्पर्धेचे साखळी फेरीचे सर्व सामने संपले आहेत. इंग्लंडचा फुटबॉल संघदेखील बाद फेरीत दाखल झाला आहे. यादरम्यान श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या सलग दुसऱ्या विजयानंतर इंग्लंडने टी-२० मालिका जिंकली आहे. त्यांचा आगामी सामना हा जर्मनीसोबत येत्या मंगळवारी २९ जुन रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!