मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. यावेळी श्रीलंका दौर्यावर जाणारी टीम इंडिया पूर्णपणे वेगळी असणार आहे. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मासह इंग्लंड दौऱ्यावर असणारा संघ नसणार आहे. विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि इतर सहाय्यक कर्मचारी मुख्य भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. पण द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्यावरर नेमकं काय करणार, याचा खुलासा भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने केला आहे.
सचिनने यावेळी सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद मिळाल्यानंतर खेळाडूच्या तंत्रावर जास्त लक्ष देण्याची गरज नसते. कारण खेळाडू जेव्हा चांगल्या फॉर्मममध्ये नसतो तेव्हा त्याचे तंत्र चांगले असते पण त्याला मानसीक पाठिंबा देण्याची गरज असते. खेळाडूंना तंत्राबाबत शिकवण्यापेक्षा ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे चांगले ठेवता येईल, यावर जास्त भर द्यायला हवा. माझ्यामते द्रविड देखील असच करेल, द्रविडने या खेळाडूंसोबत बराच काळ एकत्र घालवला आहे. त्यामुळे त्याला खेळाडूंबद्दल माहित आहे, या गोष्टीचा चांगलाच फायदा द्रविड आणि संघातील खेळाडूंना होईल.”
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- राज्यात आज १०,१३८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

