औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अॅवॉर्डस (आयएसएसी) २०२० जिंकला आहे. भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी (दि.२५) ही घोषणा केली. अवासन व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी २०१९ मध्ये ‘माझी स्मार्ट बस’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते.
अवासन व शहरी कामकाज विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम कार्यक्रमास विडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
१०० बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प ३२ मार्गांवर कार्यरत होते. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल २२ हजार किमी किलोमीटर नेटवर्क व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण ५२ लाख किलोमीटर धावताना ८७ लाखाहून अधिक प्रवाशांना सेवेचा लाभ दिला आहे. लॉकडाउननंतर नवीन डिजिटल अवतार मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
ई-तिकिटिंग, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड, बस ट्रॅकिंग मोबाइल अॅप अशा नवीन व आकर्षक योजना आणि सुविधांसह बससेवा सुरू करण्यात आली. शहरात १५० स्मार्ट बस थांबे आणि ४०० चिन्हांचे खांब बस सेवेला पूरक ठरणारे आहेत. या पुरस्कार बद्दल बोलताना मनपा आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीम चे अभिनंदन केले आणि यशस्वीतेसाठी सर्व भागधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जाणते पवार…बारवाल्यांकडून घेतलेली खंडणी CM फंडासाठी होती का?’
- आगामी काळात शरद पवार मार्गदर्शकाच्याच भूमिकेत असणार ?
- ‘चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ, त्यांचा अशा गोष्टी करण्यात लौकिक’
- अबब ! मास्कविना बँकेमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकावर सुरक्षारक्षकाने केला गोळीबार
- पुण्यात आजही कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना बाधितांची संख्या अधिक !


